Tue, Nov 20, 2018 01:13होमपेज › Solapur › युवक काँग्रेस अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

युवक काँग्रेस अध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 9:20PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

भाजप सरकारच्या पुतळ्याचे दहन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवकांसह 10 जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, राहुल वर्दा, अर्जुन साळवे, विवेक कन्ना, तिरुपती परकीपंडला, सुदीप चाकोते, संतोष अट्टेलरू, दिनानाथ भोसले, संजय गायकवाड (रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई सागर मुटकुळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

काँगे्रसचे खासदार राजीव सातव यांच्यावर गुजरात येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूर युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाळी वेस येथील मल्लिकार्जुन मंदिरासमोर भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी करण्यात आली. शहरात जमावबंदी आदेश लागू असतानाही या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरील सर्वांविरुद्ध  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.