Sun, Jul 21, 2019 16:40
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सोलापूर : महापौरांनी केला दामिनी पथकाचा सन्मान

सोलापूर : महापौरांनी केला दामिनी पथकाचा सन्मान

Published On: Mar 08 2018 6:02PM | Last Updated: Mar 08 2018 6:02PMसोलापूर :  प्रतिनिधी  

उमाबाई श्राविक विद्यालय व  कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दामिनी पथकाला सन्मानित करण्यात आले.

पोलिस खात्‍याअंतर्गत दामिनी पथकाच्या माध्यमातून विद्यार्थीच्या संरक्षनाचे धाडसी व पवित्र कार्य दामिनी पथकाकडून करण्यात येते. अशा  समर्पित भावनेने कार्यरत असलेल्या या दामिनी पथकाचा सन्मान आज महाविद्यालयाच्या सभागृहात महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.

त्याचबरोबर विद्यालय व महाविद्यालयाच्या शिक्षिकांचा यावेळी सत्कार करण्यात आले. यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी महिलादिनाच्या दामिनी पथक व विद्यार्थीनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यद्यापक सुकुमार मोहले ,विलास लिंगरे, आदी मान्यवरांसा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.