होमपेज › Solapur › दिव्यांगांच्या अदाकारीने रसिक मंत्रमुग्ध 

दिव्यांगांच्या अदाकारीने रसिक मंत्रमुग्ध 

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 9:04PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने जागतिक अपंगदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या दोन दिवसीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने रविवारी रंगभवन सभागृहात करण्यात आला. यावेळी दिव्यांग  विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांस जि.प. अधिकारी, कर्मचारी व उपस्थित असलेल्या रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजकल्याण सभापती शीला शिवशरण अध्यक्षस्थानी होते. यावेळी अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, समाजकल्याण अधिकारी विजय लोंढे, समाजकल्याण विभागाच्या सामाजिक वैद्यकीय कार्यकर्त्या साधना कांबळे आदी उपस्थित होते. 

यावेळी दिव्यांग  विद्यार्थ्यांनी लोकगीते, भजन, कीर्तन, लोकनृत्य, लावणी आदी कलाप्रकार सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. दिव्यांग असतानाही अत्यंत हिमतीने व जिद्दीने यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाप्रकारामुळे जि.प. अधिकारी आश्‍चर्यचकीत झाले. प्रारंभी चार हुतात्मा पुतळा ते रंगभवन सभागृहापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

या सांस्कृतिक कार्यक्रमात शहीद गोसावी अंध शाळा, पंढरपूर, करुणा मतिमंद शाळा, मंगळवेढा, मूकबधिर निवासी शाळा, सांगोला, मतिमंद निवासी शाळा, केम, मूकबधिर निवासी शाळा, कुर्डुवाडी, जय जीवन अपंग शाळा, पंढरपूर, राजीव गांधी अंध शाळा, सोलापूर, मतिमंद निवासी शाळा, आंधळगाव, अस्थिव्यंग शाळा, दुधनी, मतिमंद विद्यालय, पंढरपूर, सोलापूर जिल्हा मतिमंद शाळा, सोलापूर, अस्थिव्यंग निवासी शाळा, बार्शी, सोलापूर जिल्हा मतिमंद विद्यालय, सोलापूर, मूकबधिर शाळा, अक्‍कलकोट, मूकबधिर निवासी विद्यालय, बाभूळगाव, मतिमंद निवासी शाळा, दुधनी, मंगळवेढा, बालाजी मतिमंद शाळा, सोलापूर, रोटरी नॉर्थ मूकबधिर शाळा, सोलापूर, स्वामी समर्थ मतिमंद शाळा, अक्‍कलकोट, मूकबधिर निवासी शाळा, दुधनी, जिव्हाळा मतिमंद शाळा, बार्शी, निवासी मूकबधिर शाळा, पंढरपूर, गुरुदेव मतिमंद शाळा, सोलापूर, मंगलदास निवासी शाळा, सोलापूर, ममता मूकबधिर शाळा, सोलापूर, बालाजी मूकबधिर निवासी शाळा, सोलापूर, मतिमंद निवासी शाळा, कुर्डुवाडी, गुरुदेव मूकबधिर निवासी शाळा, सोलापूर, कस्तुरबा मूकबधिर शाळा, सोलापूर, आठवले मतिमंद निवासी शाळा, बार्शी, प्रगती मूकबधिर निवासी शाळा, मुक्‍ताई मतिमंद बालगृह, लंवगी, अस्थिव्यंग शाळा, अक्‍कलकोट आदी वरील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.