Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Solapur › विनापरवाना मोर्चा काढला; गुन्हा दाखल

विनापरवाना मोर्चा काढला; गुन्हा दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानाथर्र् सोलापुरातील चार हुतात्मा पुतळा चौकातून विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी अनेकांंविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून अध्यक्ष पुरुषोत्तम कारकल, साईप्रसाद जोशी, परशुराम कारकल, संदीप जाधव, सुधाकर बहिरवाडे, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, बाळासाहेब गायकवाड, विजय पुकाळे, शिवराज झुंजे, समर्थ बंडे, पवन पाटील, डॉ. उदय वैद्य, संजय साळुंखे, विजय कोलते, किरण मोटे, निखिल कुलकर्णी, राजकुमार पाटील, सुनील कामाठी, अंबादास गोरंटला आदी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

28 मार्च रोजी विविध ठिकाणी शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ सोलापुरातील चार हुतात्मा पुतळा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी सोलापूर शहर पोलिसांनी परवानगी नाकारलेली  होती. तरीही  हा मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिलेली नसतानाही विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन घोषणाबाजी केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पांढरे तपास करीत आहेत.


  •