Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Solapur › वनविहारात वन्यजीव बचाव कार्यशाळा

वनविहारात वन्यजीव बचाव कार्यशाळा

Published On: Dec 21 2017 1:50AM | Last Updated: Dec 20 2017 9:53PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सिद्धेश्‍वर वनविहारामध्ये दोनदिवसीय वन्यजीव बचाव प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत वन विभागाचे कर्मचारी व  अधिकारी, अग्निशामक दलाचे कर्मचारी, निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी, राहत अ‍ॅनिमल संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बुधवारी सकाळी सिध्देश्‍वर वनविहारामध्ये  वन्यजीव प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार व गुरुवार असे दोन दिवस ही कार्यशाळा चालणार आहे. यासाठी सोलापुरातील पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञ यांनी पुढाकार घेतला आहे. मार्गदर्शन करण्यासाठी रेसक्यू रॅपलिंग अभ्यासक सुहास सांगवेकर यांना या कार्यशाळेत प्रमुख पाहूणे म्हणून बोलावण्यात आले आहे.

वन्यजीव प्रशिक्षण कार्यक्रमावेळी  वन विभागाचे अधिकारी संजय माळी यांनी आपल्या मनोगतात महत्त्वपूर्ण माहिती सांगितली. रेसक्यू करणे महत्त्वाचा पार्ट आहे. विहिरीत पडलेल्या एखाद्या प्राण्याला बाहेर कसे काढायचे याची कार्यशाळा राज्यभरातून सोलापुरात होत आहे हे अभिनंदनीय आहे, असे संजय माळी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुकुंद शेटे व निनाद शहा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, तर राहत अ‍ॅनिमलचे राकेश चित्तौड यांनीदेखील कार्यक्रमात आपले अनुभव व्यक्त केले.