Fri, Jul 10, 2020 21:32होमपेज › Solapur › राज ठाकरे बुझा हुआ दिया : वारिस पठाण 

राज ठाकरे बुझा हुआ दिया : वारिस पठाण 

Published On: Dec 03 2017 8:36PM | Last Updated: Dec 03 2017 8:36PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

राज ठाकरे यांच्या मनसेचे राजकीय अस्तित्व आता संपले आहे. त्यांच्याकडे असलेला एकुलता एक आमदारही त्यांना सोडून गेला आहे. राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी मनसे मुंबईतील गरीब फेरवाल्यांची तोडफोड करीत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आंचल भागातील भायखळा भागात येऊन तोडफोड करुन दाखवावी, असे खुले आव्हान एमआयएमचे आ.वारिस पठाण यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. 

आ. पठाण रविवारी दिवसभर सोलापुरात एमआयएमच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सायंकाळी सोलापुरातील सात रस्ता येथील हॉटेल सेंटर पाईंट येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले. यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पठाण म्हणाले, सोलापुरात तौफिक शेख यांना राजकीय वैमन्यस्यातून त्रास देण्याचे काम काँग्रेस करीत आहे. त्यांच्यावर खोटे केसेस दाखल करुन त्यांना जेलमध्ये पाठविण्यात आले. सर्वसामान्य जनता हे सर्व पाहत असून, शेख यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत. खोट्या केसविरुध्द न्यायालयाकडे धाव घेतली असून, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्‍वास असल्याचे त्यांनी सांगितले. 

काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जातीयवादी राजकारणाची बीजे या पक्षाकडून पेरण्यात येत आहेत. गुजरातमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीतही तेच सुरु आहे. गुजरातमध्ये दहा टक्के मुस्लिम समाज आहे. असे असतानाही कमी संख्येने असणार्‍या समाजाला आरक्षण देण्याचा घाट घालण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मात्र त्यांनी हा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले. रस्त्यावर येऊन मोर्चा काढणार्‍या समाजाला मात्र आरक्षण देण्यात येत आहे. जर कायदा हातात घेऊनच आरक्षण मिळणार असेल तर प्रसंगी त्यासाठीही भविष्यात आपण तयार आहोत. तूर्त तरी न्यायव्यवस्थेवर आपला विश्‍वास आहे. 

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राम मंदिरात दिवाळी साजरी करण्याचे वक्तव्य केले आहे. याविषयी बोलताना पठाण म्हणाले, हा विषय उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणजे सुप्रिम कोर्टाचे न्यायाधीश नाहीत. आपला न्यायव्यवस्थेवर विश्‍वास असल्याने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आपण चालू, असे त्यांनी सांगितले.