Tue, Jul 16, 2019 14:22होमपेज › Solapur › पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणाची नांगरे-पाटलांकडून पाहणी(Video)

पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणाची नांगरे-पाटलांकडून पाहणी (Video)

Published On: Feb 14 2018 5:48PM | Last Updated: Feb 14 2018 5:54PMसोलापूर : प्रतिनिधी

मंगळवारी सायंकाळी मोहोळ येथे खून आणि चोरीच्या घटनेतील संशयित दरोडेखोरांनी केलेल्‍या चाकू हल्ल्यात एकजण ठार तर, सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. या घटनेतील जखमींना तातडीने सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. हल्‍ला झालेल्‍या ठिकाणी आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलिस निरीक्षक कुंभार आणि त्यांच्या पथकाला मंगळवेढा तालुक्यातील घडलेल्या खून आणि दरोड्यातील संशयित आरोपी मोहोळ येथे मंगळवारी  येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तीन पथके तयार करून शहरातील विविध भागात दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. 

सायंकाळी आठच्या सुमारास शिवाजी चौकात तिघे संशयित दुचाकीवरून येत असल्याचे एका पथकाला दिसले. त्यावेळी या तिघांना अडविण्याचा प्रयत्न पथकातील कर्मचाऱ्यांनी केला. याचवेळी संशयित दरोडेखोरांपैकी एकाने चाकूने अचानक पथकावर हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी सचिन मागाडे, बोंबीलवार आणि लालसिंह राठोड हे जखमी झाले तर रस्यावरून जाणारे अबु कुरेशी नावाचा इसमही या हल्ल्यात जखमी झाला. हल्ला करून तत्काळ तिघा संशयित दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून एकास पकडले असून, उर्वरित दोघांची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.