Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Solapur › सोलापूर विद्यापीठाच्या रसायनशास्‍त्राचे संचालक अखेर सेवामुक्‍त

सोलापूर विद्यापीठाच्या रसायनशास्‍त्राचे संचालक अखेर सेवामुक्‍त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर विद्यापीठात विविध कारणांनी वादग्रस्त राहिलेले रसायनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. अनिल घनवट यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने अखेर सेवामुक्त केले. 

२००४ मध्ये विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कार्यरत पदेही विद्यापीठाकडे वर्ग झाली. त्यानुसार डॉ. अंजना लावंड यांना रूजू करून न  घेता त्यांच्या जागी  डॉ. अनिल घनवट यांची नियुक्ती करण्यात आली. येथूनच सुरवात झाली. डॉ. लावंड रसायनशास्त्र विभागात कार्यरत असताना पद नसल्याचे कारण सांगून  अचानक त्यांना सेवा  थांबविण्याचे पत्रही विद्यापीठाने दिले. त्यावर न्यायालयीन लढ्याला सुरवात झाली. दरम्यान  डॉ. अनिल घनवट या पदासाठी आवश्यक अर्हता नसल्याने ते अपात्र  होते , तरीही त्यांची नियुक्ती झाली. या विरूद्ध डॉ. लावंड यांनी न्यायालयात धाव घेतली. २०११ मध्ये हायकोर्टाचा सुप्रिम कोर्टात त्यांनी या निर्णयाविरूद्ध धाव घेतली होती. २०११ पासून हा न्यायालयीन लढा सुरू होता. २०१३ मध्ये हायकोर्टाने डॉ. लावंड यांची याचिका ग्राह्य धरून डॉ. घनवट हे अपात्र असल्याचा निर्णय दिला. डॉ. घनवट यांना सेवामुक्त करण्यात यावे, त्याजागी डॉ. लावंड यांची नियुक्तीचे आदेश दिले. दरम्यान या निर्णयाविरूद्ध डॉ. घनवट यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केल्याने हायकोर्टाच्या निर्णयाला स्टे मिळाला. दरम्यान  असोसिएट प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता पदाला धोका नाही असे वाटल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून आपली याचिका माघारी घेतली. त्यामुळे हायकोर्टाचा निर्णय लाईव्ह झाला.  साहजिक डॉ. लावंड यांनी हायकोर्टाचा निर्णय अंमलात न आणल्याने पुन्हा एकदा हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. यामुळे प्रतिवादी म्हणून सोलापूर विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांनाही हायकोर्टाने म्हणणे मांडणाच्या नोटिसा काढल्या. यानंतर खडबडून जागे झालेल्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तातडीची बैठक बोलावून या प्रकरणी सर्वांची झाडाझडती घेतली. व हायकोर्टाचा निर्णय तत्काळ अंमलात आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. घनवट सेवामुक्त झाले. 

विद्यापीठ तोंडघशी

घनवट यांचे हितसंबंधामुळे  तत्कालीन कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार व तत्कालीन कुलसचिव डॉ. एस. के. माळी यांनी डॉ. लावंड यांना सेवेत रुजू करून घेतले नाही. तसेच डॉ. घनवट यांना पदमुक्तही केले नव्हते. त्यामुळे पुन्हा डॉ. लावंड यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर ३१ जानेवारी २०१७ रोजी सुनावणी झाली. त्यानंतर विद्यापीठाने डॉ. लावंड रुजू करतो, असे पत्र दिले. तरीही त्यांना प्रत्यक्षात रुजू करून घेतले नाही.  अखेर या प्रकरणी विद्यापीठ तोंडघशी पडले.

Tags : solapur university, chemistry department, head, dismiss, 


  •