Thu, Aug 22, 2019 11:20होमपेज › Solapur › दोन वेळा भाजपला मतदान; पण आमदार कदम ‘सेफ’

दोन वेळा भाजपला मतदान; पण आमदार कदम ‘सेफ’

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 14 2017 1:47AM

बुकमार्क करा

मोहोळ : महेश माने

सतत चर्चेत राहणारे मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय खेळीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. कदम यांनी आपण प्रसाद लाड यांना मतदान केल्याची गुगली प्रसारमाध्यमांसमोर टाकून सर्वांनाच चकीत केले. त्यामुळे तब्बल दोन वेळा पक्षाविरोधात मतदान करणार्‍या आ. कदम यांच्यावर राष्ट्रवादी पक्षातून कारवाई कधी होणार याकडे निष्ठावंत पदाधिकारी व आमदारांचे लक्ष लागले आहे.

दोन वर्षांपासून आ. रमेश कदम हे कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगामध्ये आहेत. तरीदेखील मतदारसंघासह संपूर्ण राज्यात त्यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा होत आहे. यापूर्वी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान करत पक्षाविरोधात बंड केले होते, तर अलीकडेच झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत भाजपचे प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे जाहीर केले. याबाबतची जाहीर कबुली अल्पावधीतच मुरब्बी राजकारणी बनलेल्या आ. रमेश कदम यांनी देत मी राष्ट्रवादीच्या प्रसाद लाड यांना मतदान केले असे विधान केले होते. त्यामुळे पक्षाविरोधात जाणार्‍या आ.कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी कधी व कोणती कारवाई करणार याकडे राष्ट्रवादीमधील दिग्गज पदाधिकारी व उपनेत्यांचे लक्ष लागले आहे. 

 देऊन विकासकामे केली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना मागे टाकत त्यांनी विकास निधी खर्च करण्यात अव्वल स्थान पटाकावले होते. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आ. कदम यांच्या विकासकामांबाबतची त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यामुळे जर आ. कदमांची पक्षाने हकालपट्टी केली तर मतदारांच्या मोठ्या नाराजीला राष्ट्रवादीला तोंड द्यावे लागणार आहे. शिवाय पक्षाला मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. अन् जरी नवा चेहरा मिळालाच तर आ. कदम यांच्या विरोधाला त्या नव्या उमेदवाराला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आ.कदमांबाबत राष्ट्रवादीची अवस्था ‘धरलं तर चावतय अन् सोडलं तर पळतय’, अशीच झाली आहे.