Mon, May 20, 2019 18:52होमपेज › Solapur › दुचाकींच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार; एक जखमी

दुचाकींच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार; एक जखमी

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 9:02PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

बार्शी रोडवर तसेच तुळजापूर रोडवर झालेल्या दुचाकींच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार  झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
जाफर कादर कुरेशी (वय 55, रा. चांदणी चौक, फॉरेस्ट) हे बुधवारी  सकाळी   साडेसहाच्या  सुमारास दुचाकीवरुन बार्शी येथील त्यांच्या सासरवाडीकडे जात होते. त्यावेळी बार्शी रोडवरील कारंबा गावाजवळील स्वामी  विवेकानंद कॉलेजसमोर समोरुन भरधाव येणार्‍या दुचाकीस्वाराने    कुरेशी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही दुचाकींवरील दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच कुरेशी यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. वर्तिका अग्रवाल यांनी घोषित केले. जखमी विकास वासुदेव सिरसट (वय 32, रा. मसलेचौधरी, ता. मोहोळ) यांना खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

दुसरा अपघात तुळजापूर रोडवरील माळुंब्रा गावाजवळ झाला. यामध्ये दुचाकीवरुन जाणारा आदित्य सुभाष खराडे (वय 18, रा. मसलाखुर्द, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हा  जखमी युवक उपचार सुरू असताना बुधवारी  पहाटे मरण पावला. 

आदित्य खराडे हा मंगळवारी रात्री पवन गणपती नरवडे यांच्या एमएच 08 आर 1178 या दुचाकीवर ट्रिपल सीट बसून माळुंब्रा ते मसलाखुर्द गावाकडे जात होता. त्यावेळी माळुंब्रा गावाजवळ मागून येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने त्यात आदित्यच्या डोक्यास मार लागून तो गंभीर जखमी झाला होता.  त्यास उपचारासाठी संजय तेलंग याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेघे उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे आदित्य  मरण पावला.अपघाताची पोलिसात नोंद झाली आहे.