Thu, Apr 25, 2019 17:58होमपेज › Solapur › जखमी अवस्थेत मिळालेल्या तरुणांचा उपचारावेळी मृत्यू

जखमी अवस्थेत मिळालेल्या तरुणांचा उपचारावेळी मृत्यू

Published On: May 19 2018 10:12PM | Last Updated: May 19 2018 10:12PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर   ते  तुळजापूर   या  रस्त्यावर  हगलूर  गावाजवळ  रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत मिळून आलेल्या दोन्ही तरुणांचा उपचारावेळी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. भारत दशरथ विटकर (वय 24, रा. भारतरत्न इंदिरानगर, गेंट्याल टॉकिजजवळ, सोलापूर) आणि सागर विठ्ठल शिंदे (वय 25, रा. राठी कारखाना, गेंट्याल टॉकिजजवळ, सोलापूर) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत.

भारत विटकर व सागर शिंदे हे दोघे गुरुवारी रात्री मोटारसायकल क्र. एमएच 13 सीएच 2742 या गाडीवरुन सोलापूरहून तुळजापूरकडे जात होते. त्यावेळी तुळजापूर रोडवरील हगलूरजवळील हत्ती पंपाच्या पुढे रस्त्याच्या कडेला दोघेही जखमी अवस्थेत मिळून आले. त्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत डॉ. सिध्दार्थ कांबळे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु या दोघांचाही उपचार सुरु असताना मृत्यू झाला.