Wed, Nov 14, 2018 02:13होमपेज › Solapur › सोलापूर-तुळजापूर मार्गावर अपघात, पाच ठार

सोलापूर-तुळजापूर मार्गावर अपघात, पाच ठार

Published On: Feb 27 2018 7:37AM | Last Updated: Feb 27 2018 7:47AMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर तुळजापुर रस्त्यावर थांबलेल्या गाडीला धडक दिल्याने ५ जण जागीच ठार झाले तर सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. 

वाचा : सदाभाऊंची गाडी फोडणार्‍याचा शेट्टींकडून सन्मान(Video)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर तुळजापूर रस्त्यावर एका हॉटेलजवळ पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या गाडीला चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली.  रानडुकराला चुकविण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक जण सोलापूरचा तर चौघे कर्नाटकातील असून त्यांची नावे समजू शकली नाहीत. जखमींवर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

वाचा : सोलापुरात महिलेवर सामुहिक बलात्‍कार