Wed, Apr 24, 2019 16:08होमपेज › Solapur › सोलापुरात ट्रकखाली चिरडून महिला ठार

सोलापुरात ट्रकखाली चिरडून महिला ठार

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 11:02PMसोलापूर : प्रतिनिधी

जुना बोरामणी नाक्याकडून पुणे रोडकडे वळणार्‍या ट्रकने मागून धडक दिल्याने पादचारी महिला  जागीच  ठार  झाली.  हा  अपघात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास मार्केट यार्ड चौकात झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी याच चौकात ट्रकखाली सापडून पोलिस हवालदाराचा मृत्यू झाला होता.

उषाबाई देवीदास शिंदे (वय 45, रा. कुमार स्वामीनगर, शेळगी, सोलापूर) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालक अ. गफूर हमीद (रा. हरियाणा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास उषाबाई  शिंदे या पायी मार्केट यार्डाकडून शेळगीकडे चालत जात होत्या. त्यावेळी एचआर 38 यू 7704 क्रमांकाचा ट्रक जुना बोरामणी नाक्याकडून पुणे रोडकडे जात होता. मार्केट यार्ड चौकातील कोपर्‍यावर ट्रक वळण घेत असताना पायी जाणार्‍या उषाबाई शिंदे यांना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात उषाबाई शिंदे या गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावल्या. याची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पवार, बहिरट यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शिंदे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.