होमपेज › Solapur › सोलापूर : ट्रकने चिरडलेल्या वाहतूक पोलिसाचा मृत्यू

सोलापूर : ट्रकने चिरडलेल्या वाहतूक पोलिसाचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील मार्केट यार्ड चौकात रिक्षाला धडक मारुन पळून जाणार्‍या ट्रकला अडवणार्‍या वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून गंभीर जखमी केल्याचा प्रकार सोमवार सायंकाळी 8 च्या सुमारास घडला. जखमी पोलिसाला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार नागनाथ ननावरे असे मयत पोलिसाचे नाव आहे. दरम्यान पोलिसाला उडवून पळून जाणार्‍या ट्रकला पोलिसांनी पुणे नाक्यावर पाठलाग करुन पकडले आहे.

शहरातून जाणारा एक ट्रक रिक्षाला धडक देत महिलेला जखमी करून मार्केट यार्ड पोलिस चौकीकडे येत असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत पोलिस हवालदार ननावरे यांना देण्यात आली होती. त्यानुसार वाहतूक पोलिस कर्मचारी ननवरे यांनी मार्केट यार्ड चौकाजवळ हा ट्रक येत असल्याचे दिसताच ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने वेगाने ट्रक चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

अशाही परिस्थितीत ननावरे यांनी धाडस करत ट्रकच्या केबिनमध्ये चढून ट्रकचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रकचालकाने ननवरे यांना जोराची लाथ घातली. त्यामुळे ननावरे हे ट्रकबाहेर फेकले गेले आणि त्यांच्या पायावरून तसेच अंगावरून ट्रकची मागील चाके गेली.  यानंतर हा ट्रक पुणेच्या दिशेने पळून गेला. घटनास्थळी असलेल्या लोकांनी पोलिस कर्मचारी ननावरे यास येथील अश्‍विनी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा म्रुत्यु झाला असून या घटनेनंतर पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी रुग्णालयात दाखल होत घटनेची माहिती घेतली. दरम्यान पळून गेलेला ट्रक पुणे नाक्यावर पोलिसांनी अडवून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

Tags : solapur, truck accident, traffic police, injured,


  •