Wed, Nov 21, 2018 13:15होमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्यात वर्‍हाडाचा ट्रकला अपघात, २० जण जखमी

पंढरपूर तालुक्यात वर्‍हाडाचा ट्रकला अपघात, २० जण जखमी

Published On: Apr 27 2018 12:06PM | Last Updated: Apr 27 2018 12:06PMभोसे (क.) : वार्ताहर

लग्नासाठी निघालेला वर्‍हाडाचा ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटून पलटी झाला. या अपघातात सुमारे २० वर्‍हाडी जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, भोसे-पटवर्धन कुरोली रोडवर शेवते गावाजवळ (८ मायनर) आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वेळापूर येथे लग्नासाठी जाणार्‍या ट्रकच्या ( क्र. एमएच १२ यूए ८९९ ) ड्रायव्हरचा ताबा सुटून ट्रक पलटी झाला. या अपघातात सुमारे २० वर्‍हाडी जखमी झाले आहेत. सर्व जखमी लोक बार्डी (ता. पंढरपूर) येथील आहेत. बार्डी येथील संजय विठ्ठल बनकर यांच्या मुलाच्या लग्नासाठी ट्रक मधून निघाले होते. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जाते. घटना घडताच ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरुन पसार झाला.