Tue, Mar 26, 2019 01:33होमपेज › Solapur › टॉवेल कारखान्यातील जखमी कर्मचार्‍याचा मृत्यू

टॉवेल कारखान्यातील जखमी कर्मचार्‍याचा मृत्यू

Published On: Jul 03 2018 10:52PM | Last Updated: Jul 03 2018 10:18PMसोलापूर : प्रतिनिधी 

टॉवेल कारखान्यात काम करीत असताना पायास जखम झाल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मंगळवारी पहाटे शंकर नारायण करली (वय 71, रा. साईबाबा चौक, विजयनगर) या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी कुंभारी येथील विजयनगर नवीन विडी घरकूल येथील टॉवेलच्या कारखान्यात काम करीत असताना उजव्या पायास जखम झाल्याने खासगी दवाखान्यात उपचार घेऊन  पुढील उपचारासाठी तेथील डॉक्टर वाहीद यांनी सोमवारी शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने बेशुद्ध अवस्थेत डॉक्टराने शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारावेळी  दुसर्‍या दिवशी कामगारांचा मृत्यू झाला. 

दारुच्या नशेत गळफास  

दक्षिण तालुक्यातील दोड्डी येथे राहत्या घरी दारुच्या नशेत गळफास घेतल्याने मलिक अल्लाउद्दीन शेख (वय 38) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी राहत्या घरी दारुच्या नशेत स्लॅबच्या छतास लोखंडी आकड्याला  दोरीने गळफास घेतला. मेहुणा रजाक शेख यांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टराने घोषित केले. 

रिक्षाचालकावर गुन्हा 

रॅश ड्रायव्हिंग केल्याने त्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी रिक्षाचालक रणजित शिवाजी घाडगे  (वय 32, रा. शेळगी) याच्यावर सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अनिल गोपाळ जाधव (वय 32, रा. शेळगी) यांच्या फिर्यादीवरुन 27 जून रोजी बसवेश्‍वर तांडा ते मंगळवेढा रस्त्यावरुन रिक्षातून (एमएच 13 आर 9334) भंगार गोळा करण्यासाठी जात असताना  रिक्षाचे पुढील चाक पंक्चर झाल्याने रिक्षा पलटी झाली. यात हौसाबाई घाडगे या वृद्ध महिलेच्या डोक्यास मार लागून उपचार घेत असताना मृत्यू झाला होता.