Mon, Nov 19, 2018 23:44होमपेज › Solapur › टॉवेल कारखाना आगीत खाक; कोट्यवधींचे नुकसान

टॉवेल कारखाना आगीत खाक; कोट्यवधींचे नुकसान

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:35PMसोलापूर : प्रतिनिधी

अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील राठी टेक्स्टाईल कारखान्याला आग लागून टॉवेल कारखाना आगीत भस्म झाला आहे. यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.  बुधवारी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. कारखान्यात कच्चा आणि तयार माल असल्याने आगीने वेगाने पेट घेतला. बुधवार सुटी असल्याने कारखाना बंद होता. वॉचमन बाहेरील बाजूस झोपला होता. परिसरात  मॉर्निंग वॉकला जाणार्‍या  लोकांना आगीचे  धूर दिसले. 

अग्निशमन अधिकारी केदार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 6.40 च्या सुमारास अग्निशमन दलास आगीची माहिती प्राप्त झाली. अग्निशमनच्या  सुमारे 20 ते 22 बंबसह पाणीपुरवठा करणार्‍या टँकरमधून पाण्याचा फवारा  मारण्यात आला. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आले.महापौर शोभा बनशेट्टी, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी घटनास्थळी भेट दिली.