Thu, Apr 25, 2019 05:29होमपेज › Solapur › आज होणार ईद-उल-फित्रची नमाज

आज होणार ईद-उल-फित्रची नमाज

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 10:26PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरात आज मुस्लिम बांधव ईद-उल-फित्रची नमाज साजरी करणार आहेत. शहरातील पाचही ईदगाह मैदान सज्ज करण्यात आली आहेत.सोलापूर शहरातील रंगभवन येथील अहले हदीस ईदगाह, होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह, पानगल शाळेतील शाही आलमगीर ईदगाह, आसार मैदानवरील ईदगाह व जुनी मिल कंपाऊंड येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने नमाजसाठी दाखल होतात. रंगभवन येथील ईदगाह मैदानावर महिलांसाठी देखील नमाजची व्यवस्था करण्यात आली आहे.

सोलापूर शहरातील मुस्लिम बांधव लाखोंच्या संख्येने ईदच्या नमाजसाठी ईदगाह मैदानावर दाखल होतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ईदगाह मैदानावर जाणार्‍या मार्गावरील वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला आहे.