Fri, Apr 26, 2019 09:59होमपेज › Solapur › विनयभंगाचे तीन गुन्हे

विनयभंगाचे तीन गुन्हे

Published On: Apr 19 2018 9:57PM | Last Updated: Apr 19 2018 9:07PMसोलापूर : प्रतिनिधी

शहरात विनयभंगाच्या तीन घटना घडल्या आहेत. याबाबत विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जेलरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या पीडित वृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून अरुण तिपण्णा हत्ते (रा. दोड्याळ, ता. अक्कलकोट), तुकाराम गिरजप्पा सोनटक्के (रा. शिरसी, ता. अक्कलकोट), लक्ष्मी पंचप्पा दुधभाते (रा. शिरवळ, ता. अक्कलकोट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला अक्क्लकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ असताना मंगळवारी सायंकाळी अरुण हत्ते व तुकाराम सोनटक्के यांनी त्यांना अश्‍लिल शिवीगाळ करून मारहाण करून त्यांचा विनयभंग केला. महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. 

तसेच दुसर्‍या घटनेत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जाधव गवळी (रा. वाडी, ता. अक्कलकोट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जाधव गवळी हा पीडित महिलेच्या पाठीमागे लागून तिच्याशी जवळीक साधण्यासाठी तिचा पाठलाग करून फोन नंबर मागून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला, म्हणून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मुरकुटे तपास करीत आहेत.

तर तिसर्‍या घटनेत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पर्‍या उर्फ प्रफुल प्रवीण इंगळे (वय 20), शुभम सिद्धाराम गायकवाड (23, दोघे  रा. सुुंदरम नगर, सोलापूर) आणि स्वप्निल बंडू नाईकनवरे (22, रा. अमृत नगर, सोलापूर) याच्याविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी क्लासला जाताना वारंवार तिघांनी तिचा पाठलाग करून मित्राला नाही म्हणालीस तर बघ तुझ्यावर पण वाईट परिणाम होतील असे धमकावून प्रेमाने बोल असे म्हणून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक आवारे तपास करीत आहेत.