Mon, Mar 25, 2019 13:36होमपेज › Solapur › सोलापूर : ऊसदरावरुन आंदोलक व सभासद आमने-सामने

सोलापूर : ऊसदरावरुन आंदोलक व सभासद आमने-सामने

Published On: Dec 08 2017 8:10PM | Last Updated: Dec 08 2017 8:07PM

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी

ऊसदराच्या प्रश्‍नावरुन शुक्रवारी माढा तालुक्यात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सभासद आमने-सामने आल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना अटक केल्यामुळे हा तणाव निवळला खरा, परंतु येणार्‍या काळात हा विषय तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

चालू गळीत हंगामात  गाळपास आलेल्रा उसास प्रति टन एफआरपी प्लस ४०० रुपरे पहिली उचल देण्रात रावी व सन २०१६-२०१७ मधील उसास श्रीरंगराजन समितीच्रा शिफारशींप्रमाणे ७०:३० च्या सूत्रानुसार  प्रति टन राहिलेली २३१ रूपये रक्कम त्वरित द्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ८ डिसेंबर रोजी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्‍यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानीचे नेते टेंभूर्णीजवळील तांबवे येथे दाखल झाले होते. तर दुसरीकडे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे सभासद आ. बबनदादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारखानस्थळावर दाखल झाले होते. त्यामुळे काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. 

विरोधकांचे गलिच्छ राजकारण : आ.  शिंदे

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्‍याचे चांगले चाललेले बघवत नसल्राने काही राजकीय मंडळी शेतकरी संघटनेच्या आडून कारखान्‍याविरोधात गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप आ. बबनराव शिंदे रांनी केला. शुक्रवारी सकाळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना रेथे सभासद, शेतकर्‍यांच्यावतीने कारखान्‍याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्रा बैठकीत आ. शिंदे बोलत होते. 

अन्यथा पंधरा दिवसांत कारखाना बंद पाडणार : आंदोलकांचा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धरणे आंदोलनास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारूनही संघटनेच्या पदाधिकारी व कार्यर्त्यांनी टेंभुर्णी- कुर्डुवाडी रोडवर तांबवे गावच्या हद्दीत सुमारे ४५ मिनिटे रास्ता रोको आंदोलन करून साखर कारखानदारांच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध करून एफआरपी प्लस ४०० रुपरे एवढा प्रथम हप्ता देण्याची आग्रही मागणी करण्यात आली. पंधरा दिवसांत निर्णय झाला नाही तर कारखाना बंद पाडू, असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे .