Mon, Jan 21, 2019 13:02होमपेज › Solapur › पत्नी नांदत नाही म्हणून आत्महत्या

पत्नी नांदत नाही म्हणून आत्महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

पत्नी नांदावयास येत नाही या कारणाने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात झाली आहे.

यामधील सविस्तर वृत्त असे की, संजय परशुराम धुळराव (वय 31, रा. विजापूर नाका, झोपडपट्टी क्रमांक 1, सोलापूर) या तरुणाने राहत्या घरी शनिवारी सायंकाळी पत्नी नांदावयास येत नाही या कारणावरुन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला.कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब विजापूर नाका पोलिस ठाण्यास कळविले. पोलिस नाईक कांबळे यांनी घटनास्थळावर जाऊन संजय धुळराव यास तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेच्या संदर्भात  अधिक तपास विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक कांबळे करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमधून प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनास्थळी गर्दीही झाली होती.