Fri, Apr 19, 2019 12:16होमपेज › Solapur › मिरवणुकीत ट्रेलर आणून वाहतुकीस अडथळा; मंडळावर गुन्हा दाखल

मिरवणुकीत ट्रेलर आणून वाहतुकीस अडथळा; मंडळावर गुन्हा दाखल

Published On: Apr 18 2018 10:26PM | Last Updated: Apr 18 2018 10:04PMसोलापूर : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या सांगता मिरवणुकीत ट्रेलर आणून त्यावर साऊंडसिस्टिम व लाईटिंगचे डेकोरेशन करुन वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह ट्रेलरचालकाविरुध्द जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस  नाईक अमित रावडे यांच्या फिर्यादीवरुन उत्सव अध्यक्ष शुभंकर अविनाश बनसोडे, संस्थापक अध्यक्ष रूपेश थडसरे, ट्रेलरचालक प्रशांत शिंदे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री दयानंद कॉलेज चौक ते सम्राट चौक या मार्गावरुन उत्सव अध्यक्ष शुभंकर बनसोडे, संस्थापक अध्यक्ष रूपेश थडसरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणूक काढली होती. 

या मिरवणुकीत प्रशांत शिंदे याच्या एमएच 40 एन 2675 या ट्रेलरवर 15 फूट लांब व 15 फूट उंचीचे साऊंडसिस्टिम व लाईटिंग डेकोरेशन लावून येणार्‍या-जाणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना व वाहनांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण केला म्हणून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक मुजावर तपास करीत आहेत.

पैशासाठी विवाहितेचा छळ; चौघांविरुध्द गुन्हा दाखल पैशासाठी विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह चौघांविरुध्द  फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशाखा कुंवरजीत दुधनकर (वय 26, रा. अवंतीनगर, दत्त मंदिरासमोर, जुना पुना नाका, सोलापूर, सध्या दक्षिण कसबा, टोळाचा बोळ, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरुन दीर श्रीचंद अशोकराव  दुधनकर, सासरे अशोकराव मल्लिकार्जुन दुधनकर, पती कुंवरजीत अशोकराव दुधनकर, सासू कस्तुरी अशोकराव दुधनकर (सर्व रा. अवंतीनगर, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाखा व कुंवरजीत यांचा विवाह 3 डिसेंबर 2017 रोजी झाला असून लग्न झाल्यापासून 20 ते 25 दिवसांनंतर कुंवरजीत याच्या घरातील लोकांनी विशाखा हिस मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली.

 विशाखाला वेळेवर जेवण न देणे, उपाशी ठेवणे, हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. लग्नामध्ये विशाखाच्या वडिलांनी एक लाख रुपये  व वडिलोपार्जित दिलेले सात तोळे सोने, भांडीकुंडी, फर्निचर सर्व साहित्य स्वतःकडे ठेऊन विशाखा हिस अंगावरील कपड्यानिशी हाकलून दिले म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिवसे तपास करीत आहेत.

रात्री उशिरापर्यंत स्पिकर चालू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जुने विडी घरकुल परिसरातील  सागर  चौकातील सर्वधर्म प्रतिष्ठान या मंडळाने  सोमवारी रात्री उशिरापर्यंत स्पिकर लावून न्यायालय व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही म्हणून निलेश अनिल दणाणे (वय 23, रा. एमआयजी ग्रुप, सागर चौक, हैदराबाद रोड, सोलापूर) याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक फौजदार दिघे यांनी फिर्याद दाखल केली आहे.  हवालदार मंठाळकर तपास करीत आहेत.
पैशासाठी विवाहितेचा छळ; चौघांविरुध्द गुन्हा दाखल

व्यवसायासाठी  माहेराहून  दोन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुध्द जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मेघाली सागर बगले (वय 28, रा. तुळजापूर वेस, जोडभावी पेठ, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरुन पती सागर सुरेश बगले, सासू सुनंदा सुरेश बगले, सासरे सुरेश लक्ष्मण बगले, दीर संतोष सुरेश बगले (रा. तुळजापूर वेस, सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणले नाही तर सागर याने दुसरे लग्न करतो, अशी धमकी देऊन मेघाली हिस मारहाण केल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सानप तपास करीत आहेत.