Mon, Aug 19, 2019 17:36होमपेज › Solapur › राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे उद्या धरणे आंदोलन

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे उद्या धरणे आंदोलन

Published On: Mar 25 2018 10:34PM | Last Updated: Mar 25 2018 10:07PMसोलापूर : प्रतिनिधी

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने अंशदायी पेन्शन योजना आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात 27 मार्च रोजी शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.  

 प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी आवाहन केलेले आहे. 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना अंशदायी पेन्शन योजना लागू झालेली आहे. ते रद्द करुन त्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी व राज्यातील कंत्राटीकरण बंद करावे, या इतर मागण्यांसाठी सह्यांचे निवेदन पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत द्यावयाचे आहे.

सोलापूर जिल्ह्यात देखील मंगळवार, 27 मार्च 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे व त्याचदिवशी पंतप्रधानांना जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यामार्फत अंशदायी पेन्शन योजना आणि कंत्राटीकरणाबाबत सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय मशासकीय व जिल्हा परिषद येथील सर्व खातेनिहाय संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचार्‍यांनी सदरच्या धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक शंकर जाधव, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना सोलापूर जिल्ह्याचे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुतळे, कार्याध्यक्ष भीमराव लोखंडे, किशोर सावळे, उपाध्यक्ष रुथ कलबंडी, प्रवीण शिरसीकर, प्रवीण भंडारी, संघटक विजय पोटफोडे तसेच जिल्हा परिषद कमर्र्चारी महासंघ सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष यशवंत गवळी, सचिव शिंदे, विभागीय सहसचिव रमाकांत साळुंखे व राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व जिल्ह्याचे अध्यक्ष शंतनू गायकवाड, कार्याध्यक्ष अनिल शेंडगे, उपाध्यक्ष राहुल सुतकर, उमेश कदम, सरचिटणीस सटवाजी व्होटकर आदींनी आवाहन केलेले आहे.