Thu, Jul 18, 2019 12:18होमपेज › Solapur › समाजकल्याण सहायक आयुक्ताला मारहाण

समाजकल्याण सहायक आयुक्ताला मारहाण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

समाजकल्याणच्या सहायक आयुक्ताला मारहाण केल्याप्रकरणी रिक्षाचालकासह दोघांविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित मुरलीधर घवले (वय 34, रा.  हांडे प्लॉट, जुना पुना नाका, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षा क्र. एमएच 13 बीव्ही 0379 चालक व त्याचा साथीदार (रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित घवले हे समाजकल्याण विभागात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या कारमधून पत्रकार भवन चौकाकडून कंबर तलावाकडे जात होते. त्यावेळी वॉटर फ्रंट इमारतीसमोर पाठीमागून आलेल्या एमएच 13 बीव्ही 0379 क्रमांकाच्या रिक्षाचालकाने व त्याच्या साथीदाराने कारच्या आडवी रिक्षा लावून तुला मस्ती आली का बे, असे म्हणून शिवीगाळ करुन दमदाटी करून मारहाण केली म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार भोईटे तपास करीत आहेत.
फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

परमिटधारकाची फसवणूक करून 4 लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय वैजिनाथ गुरव (वय 42, रा. कल्याणनगर भाग 2, मजरेवाडी, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून मधुकर निवृत्ती शिंदे, अज्ञात महिला, बाळासाहेब फाळके, आरटीओ कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय गुरव यांनी रिक्षा वाहन परवाना क्र. 968/84 व त्याबाबतची माहिती अधिकारात आरटीओ कार्यालयातून माहिती मागवून घेतली होती. त्यावेळी त्यामध्ये वरील सर्वांनी संगनमत करुन गुरव यांचे नुकसान व्हावे या उद्देशाने आरटीओ कार्यालयातील कागदपत्रांमध्ये अनधिकृत व अवैध अशी खाडाखोड करुन शिंदे व अज्ञात महिलेचा फोटो बदलून सह्यादेखील बदलल्या. 

शिंदे यांच्या नावे असलेले परमिट जे की गुरव यांनी घेतले होते. ते परमिट पुन्हा खोटेपणाने शिंदे यांच्या नावे करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.