होमपेज › Solapur › नंदीध्वज अक्षतांसाठी आले दिमाखात

नंदीध्वज अक्षतांसाठी आले दिमाखात

Published On: Jan 14 2018 1:55AM | Last Updated: Jan 13 2018 8:48PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

हलगीचा निनाद, नाशिक ढोलचा गजर आणि आधुनिक संगीतावर भक्तीगीतांची मैफल अशा वाद्यांच्या गजरात मानाच्या काठ्या अक्षता सोहळ्यासाठी हिरेहब्बू वाड्यातून सिध्देश्‍वर मंदिराकडे रवाना झाल्या. हिरेहब्बू वाडा येथे शनिवारी सकाळी आठ वाजता मानाच्या सात काठ्या एकत्रित आल्या. सुरूवातीला हिरेहब्बू व परिवाराच्यावतीने सात मानाच्या काठ्यांची आरती करून मिरवणुकीस सुरुवात झाली.  मिरवणुकीस हिरेहब्बू वाडा येथून सुरुवात झाली. पुढे ती दाते बोळ, दत्त चौक, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टामार्गे सिध्देश्‍वर मंदिर येथे आली. या मिरवणुकीत श्री सिध्देश्‍वर महाराजांच्या पालखीचा सहभाग होता.  पालखीतील सिध्देश्‍वरांची मूर्ती व पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती तसेच यामध्ये नाशिक ढोल, हलगी, आधुनिक संगीत व त्यांच्या तालावर भक्तीगीते सादर केली गेली. 

तगडा पोलिस बंदोबस्त     दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही लाखोंच्या उपस्थितीमध्ये अक्षता सोहळा झाला. दरवर्षी वाढत्या गर्दीमुळे पोलिस बंदोबस्तामध्येदेखील वाढ करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी 1 पोलिस आयुक्त, 2 डीसीपी, 3 एसीपी 7 पोलिस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 270 पुरुष पोलिस कर्मचारी, 72 महिला पोलिस कर्मचारी, 4 डायझिंग कंपन्या, आरसीपीची 1 कंपनी, गुन्हे शाखेचे सर्व पोलिस कर्मचारी असा पोलिस फौजफाटा अक्षता सोहळ्यासाठी तैनात करण्यात आला होता.  महापालिका आयुक्त डॉ. अनिवाश ढाकणे,  माजी आ. विश्‍वनाथ चाकोते, नरसिंग मेंगजी, शिवशरण पाटील, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अविनाश पाटील, महादेव चाकोते, इंद्रजित पवार, सिद्धाराम चाकोते, बाळासाहेब शेळके, मनोहर सपाटे, केदार उंबरजे, शाहू शिंदे, उदयशंकर पाटील आदी मान्यवरांनी हजेरी लावली.