Fri, Nov 16, 2018 21:58होमपेज › Solapur › शिवसेनेच्या नगरसेवकाकडून पोलिस निरीक्षकाला धक्काबुक्की

शिवसेनेच्या नगरसेवकाकडून पोलिस निरीक्षकाला धक्काबुक्की

Published On: Jan 30 2018 2:27PM | Last Updated: Jan 30 2018 2:27PMसोलापूर : प्रतिनिधी 

मारहाणीची तक्रार घेऊ नको म्हणून सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी पोलिस निरीक्षकाला धक्काबुक्की करत जखमी केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक असलेले शिंदे यांनी मंगळवारी पहाटे बाळे येथील एका हॉटेलात दारु पिऊन निवडणुकीच्या कारणावरुन व्यापार्‍यास मारहाण केली होती. यानंतर संबंधित व्यापारी हा बाळे पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेला होता. मारहाणीची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शहाजी पवार हे पोलिस चौकीत गेले होते. यावेळी नगरसेवक शिंदे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत व्यापार्‍यास तसेच पोलिस कर्मचार्‍यांना ‘मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही का’ असे म्हणत धमकाविण्यास सुरूवात केली. याचवेळी उपस्थित पोलिस निरीक्षक पवार यांनी शिंदे यांना समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु दारुच्या नशेत असलेल्या शिंदे यांनी पवार यांनाच धक्काबुक्की करत ढकलून दिले. यात पवार यांच्या हाताला जखम झाली असून पोलिसांनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.