Thu, Feb 21, 2019 23:47होमपेज › Solapur › सोलापूर : बंदोबस्‍ताच्या पोलिसांसाठी चहा, नाष्‍टा

सोलापूर : बंदोबस्‍ताच्या पोलिसांसाठी चहा, नाष्‍टा

Published On: Jan 03 2018 4:14PM | Last Updated: Jan 03 2018 4:14PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये बंदला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सकाळच्या टप्प्यात संमिश्र प्रतिसाद मिळला आहे. शहरासह जिल्‍ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्‍त आहे. दरम्‍यान बंदोबस्‍तासाठी असलेल्‍या पोलिसांसाठी एका ग्रुपच्यावतीने चहा आणि नाष्‍ट्याची सोय करण्यात आली होती.

मागील तीन दिवसांपासून शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अहोरात्र बंदोबस्तावर असलेल्‍या पोलीसांना शाब्दी सोशल ग्रुपच्यावतीने चहा, पाणी व नाष्‍ट्याची  व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे पोलिसांकडून या ग्रुपच्या कार्याबद्दल समाधान व्यक्‍त करण्यात आले.