Sat, Feb 23, 2019 10:08होमपेज › Solapur › सोलापूर : माढा तालुक्‍यात निवडणूक निकालावरुन दोन गटात हाणामारी

सोलापूर : माढा तालुक्‍यात निवडणूक निकालावरुन दोन गटात हाणामारी

Published On: Feb 28 2018 8:26PM | Last Updated: Feb 28 2018 8:31PMटेंभुर्णी : प्रतिनिधी

माढा तालुक्‍यातील सापटणे (टें) रेथे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक निकालावरून गावातील दोन गटात बाचाबाची झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण झाले होते. याप्रकरणात पाच ते सहा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. पोलिसांनी वेळीच बंदोबस्‍त वाढविल्याने वाद वाढले नाहीत. बुधवारी दुपारी हे वाद झाले.

सापटणे (टें) रेथे एका सदस्याने ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्‍या जागेची निवडणूक झाली होती. या जागेवर विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्‍याचे संचालक बाळासाहेब ढवळे यांच्या गटाचा रोहित उर्फ अक्षर जगन्नाथ ढवळे निवडून आले.

यानंतर विजयी उमेदवारांसह कायर्कर्ते काही गाड्यांमधून जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे रांना भेटण्यास जात असताना विरोधी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी सापटणे ते सापटणे पाटी या रस्‍त्यावर वाहनांवर हल्‍ला करण्यात आला. यामध्ये पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. यावेळी पोलिस जीपही बरोबर होती. 

या घटनेमुळे गावात ताणतणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बंदोबस्‍त वाढवला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक आनंद खोबरे आदी पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी पोलिस मुख्यालय, करमाळा येथून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आला होता. उशिरापर्रंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.