Sun, May 26, 2019 20:55होमपेज › Solapur › उजनीत येणारा दौंडचा विसर्ग पुन्हा वाढला

उजनीत येणारा दौंडचा विसर्ग पुन्हा वाढला

Published On: Jul 23 2018 2:58PM | Last Updated: Jul 23 2018 2:58PMसोलापूर :  सिध्देश्वर शिंदे 

सोलापूर जिल्हाचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाच्या टक्केवारीचा काटा गेले दोन तीन दिवस मंदावला होता. वरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला होता त्यामुळे बंडगार्डन व दौंड येथुन येणाऱ्या पाण्यात मोठी घट झाली होती. मात्र पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने उजनी वरील सात धरणातुन 13423 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  दौंड येथुन उजनीत येणाऱ्या विसर्गात वाढ होवू लागली आहे. या अगोदर दोन दिवस केवळ 6286 क्युसेक ने येणाऱ्या विसर्गात वाढ होवुन आज सकाळपासुन 20175 क्युसेक ने पाणी येवू लागले आहे. स्थिर झालेला पाणीसाठ्यात वाढ  होवू लागली आहे. आज उजनी धराणात जवळपास 25% पाणीसाठा झाला होता.

वीर धरणातून निरा नदीत 13662 क्युसेकचा विसर्ग चालू केला असून तो लवकरच निरा नरसिंहपूर मध्ये भिमा नदीत दाखल होणार असल्याने भिमा नदीत पाणीपातळी वाढणार आहे. सध्या उजनी धरणांच्या वरील बाजुला असलेल्या 19 धरणापैकी 11 धरणातील पाणीसाठा 90 ते 100% पर्यंत झाला आहे. (येडगाव 96%, कलमोडी 100%, चासकामान 97%, भामाआसखेड 87%, वडिवले 86%,  आंध्र 99%, पवना 91%कासारसाई 91%, मुळशी 86, पानशेत 99%, खडकवासला 100%)  

 उजनी धरणात यावर्षी जो पाणीसाठा झाला तो टप्याटप्प्याने झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पहिला टप्पा पूर्ण केला.

तर जुलै 16 ला उजनी प्लस मध्ये आले सलग 19% पर्यत पाणीसाठा झाला.  त्यानंतर तीन चार दिवस दौंड येथुन धरणात येणारा विसर्ग घटत गेला. परत वरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केल्याने  बंडगार्डन व दौंड येथुन येणाऱ्या विसर्गात वाढ होत आहे. एक वेळ दौंड येथुन 66000 क्युसेक चा विसर्ग येत होता त्यात टप्याटप्याने घट होत तो सध्या 6286 क्युसेक झाला आहे. त्यामुळे उजनीत वेगाने होणारा पाणीसाठा संथ झाला .

सध्या उजनी धरणाची एकूण पाणिपातळी 492.610, एकूण पाणिसाठा 2138.25, उपयुक्त पाणिसाठा 335.94, टक्केवारी 22.14% अशी आहे.

यावर्षी उजनी धरणात पावसाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत  49% पाणी आले आहे. उजनी धरण भरते की नाही या चिंतेत असणाऱ्या शेतकरी वर्गात उजनी धरणात वाढत असलेल्या पाणी साठ्यामुळे आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे पण, उजनीता 100% पाणीसाठा नेमका कधी होणार? ही चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.