Thu, Apr 25, 2019 15:54होमपेज › Solapur › रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षांना मज्जाव

रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षांना मज्जाव

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:02PMसोलापूर : प्रतिनिधी   

सोलापूर रेल्वेस्थानक परिसरात वर्षानुवर्षे रिक्षा वाहतुकीचा व्यवसाय करणार्‍या चालकांना अचानक रेल्वे प्रशासनाने व्यवसाय करण्यास तसेच स्टेशन परिसरात रिक्षा नेण्यास मज्जाव केल्याने सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात चांगलाच गोंधळ झाला.

 स्टेशन परिसरात  रिक्षाचालकांना अचानक आतमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. याठिकाणी त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवली असतानाही सोमवारी त्यांना रिक्षा आतमध्ये नेण्यास विरोध करण्यात आला. तसेच त्याठिकाणी दोरी बांधून राखीव जागेतही रिक्षा उभ्या करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला. त्यामुळे रिक्षाचालक संघटना चांगलीच आक्रमक झाली. त्यामुळे रेल्वे प्रशासन व चालक यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

यावेळी काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे, विनोद गायकवाड, माजी नगरसेवक दिलीप कोल्हे तसेच रिक्षा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी डीआरएम यांची भेट घेऊन पूर्वीप्रमाणे व्यवसाय करू देण्याची मागणी केली तसेच जर सर्वच रिक्षा रस्त्यावर काढल्या तर ट्रॅफिक पोलिस रिक्षांवर कारवाई करतील. त्यामुळे रिक्षाचालकांना त्रास होईल आणि स्टेशनसमोर गर्दीही वाढेल. रेल्वे प्रशासनाने रिक्षाचालकांना सहकार्य करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.