होमपेज › Solapur › रोजगार प्रोत्साहन योजनेत नोंदणी करा

रोजगार प्रोत्साहन योजनेत नोंदणी करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

रोजगार निर्मितीला प्रोत्साहन व कामगारांना आर्थिक मदत यासाठी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेमध्ये नवीन कामगारांची नोंदणी करा, असे आवाहन पीएफ अधिकारी डॉ. हेमंत तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत  केले.

एप्रिल 2016 ते मार्च 2019 नवीन कामगारांनी नोंदणी करावी. यामध्ये ईपीएफ 12 टक्के पैकी 8.33 टक्के रक्कम भारत सरकार जमा करणार आहे.  तर कंपनीला केवळ उर्वरीत 3.67 टक्के एवढीच रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी कामगार नवीन असला पाहिजे. तो 1 एप्रिल 2016  किंवा त्याच्यानंतर लागलेला असावा. त्याने 1 एप्रिल 2016  च्या पूर्वी कोणत्याची ईपीएफ नोंदणीकृत संस्थांमध्ये काम केलेले नसावे. त्यांचा पगार 15 हजार रूपयेपेक्षा कमी असावा आणि त्यांना आधार सोबत जोडलेला युनिव्हर्सल अकाऊंट  नंबर 1 एप्रिल 2016 च्या नंतर दिला गेलेला पाहिजे. त्यामुळे नवीन कामगारांनी ही र्सेीं.ळप या वेबसाईटवर माहिती भरुन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. 

सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योगामध्ये कामगारांना पीएफ देण्यावरुन मागील अनेक दिवसांपासून मालक आणि कामगारांमध्ये प्रचंड संघर्ष सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तिरपुडे यांनी केलेल्या घोषणेला महत्त्व आले आहे.