Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Solapur › बलात्कार प्रकरणातील पोलिस कर्मचारी निलंबित

बलात्कार प्रकरणातील पोलिस कर्मचारी निलंबित

Published On: Dec 20 2017 1:47AM | Last Updated: Dec 19 2017 11:11PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

 एका महिलेवर बलात्कार करून तिचे व्हिडीओ चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या पोलिसाला पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी निलंबित केले. पोलिस शिपाई स्वप्निल ऊर्फ भीमराव अरविंद इंगळे (ब. नं. 1383, वय 29, रा.  रामलिंग सोसायटी) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचेे  नाव आहे. याबाबत पीडित  महिलेच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एस. टी. महामंडळात नोकरीस असलेल्या महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार  करून  तिचे विवस्त्र व्हिडीओ चित्रीकरण करून इंगळे याने तिला धमकी देत अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिलेला रस्त्यात अडवून मारहाणदेखील इंगळे याने केली होती.