होमपेज › Solapur › संभाजी ब्रिगेडचे राम कदम यांच्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन

संभाजी ब्रिगेडचे राम कदम यांच्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन

Published On: Sep 06 2018 1:43AM | Last Updated: Sep 05 2018 10:24PMसोलापूर : प्रतिनिधी

मुंबई येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन संभाजी ब्रिगेडच्यावतीने बुधवारी छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे करण्यात आले.

आ. कदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले.  संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांच्यावतीने  आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत राम कदम तमाम महिला भगिनींची जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत संभाजी  ब्रिगेड गप्प बसणार नाही. कदम यांना राज्यात रस्त्यावर फिरू देणार नाही. जिजाऊंच्या लेकींची बदनामी करणार्‍या  कदमांना माफ करणार नाही, असा सज्जड इशारादेखील यावेळी देण्यात आला.  

जोपर्यंत सरकार  कदम यांचा आमदारकीचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही, असेही संभाजी ब्रिगेडच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष    इम्तियाज पिरजादे,   जिल्हाध्यक्ष   सोमनाथ  राऊत, शहराध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, कार्याध्यक्ष प्रकाश ननवरे, उपाध्यक्ष चेतन चौधरी, प्रसिद्धीप्रमुख राकेश डोंगरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष नंदाताई  शिंदे,  प्रदेश संघटक लता ढेरे, जिल्हाध्यक्ष निर्मलाताई शेळवणे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सदाशिव पवार, उत्तर तालुका अध्यक्ष गणेश निळ यांच्यासह इतर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.