Sat, Feb 23, 2019 22:41होमपेज › Solapur › .. तर टीसीविरोधात करा ऑनलाईन तक्रार

.. तर टीसीविरोधात करा ऑनलाईन तक्रार

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:07PMसोलापूर ः प्रतिनिधी

रेल्वे प्रवासात जादा रकमेची मागणी करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांविरोधात रेल्वे प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक दिला असून प्रवाशांनी 155210 या क्रमांकावर संपर्क करुन भ्रष्टाचारी रेल्वे कर्मचार्‍यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे.

लाखो लोक रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात.आशिया खंडात भारतीय रेल्वेचे जाळे सर्वात मोठे आहे. अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यास अधिक पसंती देतात. यामध्ये अनेक प्रवासी विनातिकीटदेखील प्रवास करतात.काही प्रवासी घाईगडबडीत तिकीट न काढता रेल्वे प्रवासाला सुरुवात करतात. कधी कधी अनेक प्रवासी जनरल डब्याचे तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करतात.
विनातिकीट प्रवास करणार्‍या  प्रवाशांवर किंवा जनरल डब्याचे तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करणार्‍या प्रवाशांवर अंकुश आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वतंत्ररित्या टीटी किंवा टीसी यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार तिकीट चेकिंग स्क्वाडदेखील नियुक्त केले जातो. विनातिकीट प्रवास करणार्‍या  प्रवाशांकडून तिकीट तपासनीस  तिकिटाची रक्कम व दंड अशी रक्कम वसूल करतात. काही वेळा तिकीट तपासनीस जादा रकमेची मागणी केल्याच्या तक्रारी रेल्वे बोर्डाला मिळाल्या होत्या. त्याअनुषंगाने तिकीट तपासनीस रेल्वे प्रवास सुनिश्‍चित करण्यासाठी आरक्षित किंवा अनारक्षित डब्यातील विनातिकीट प्रवास कणार्‍यांकडून एकूण तिकिटाची रक्कम व दंड यापेक्षा अधिक रक्कम मागत असेल तर 155210 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

सोलापूर मध्य रेल्वे विभागात हेल्पलाईन क्रमांक

विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांनी तिकीट तपासनीस यांच्याकडे तिकिटाची एकूण रक्कम व दंड अशी रक्कम भरणा करावी. प्रवास करताना तिकीट तपासनीस एकूण तिकीट व दंड यापेक्षा अधिक रक्कम मागत असेल तर त्याविरोधात 155210 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून प्रवासी तक्रार करु  शकतात, असे सोलापूर मध्य रेल्वे  अधिकार्‍यांनी सांगितले आहे.