Wed, Sep 19, 2018 10:27



होमपेज › Solapur › सोलापूर : ‘इंद्रायणी’ला पंधरा दिवसांचे ग्रहण

सोलापूर : ‘इंद्रायणी’ला पंधरा दिवसांचे ग्रहण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





सोलापूर : प्रतिनिधी

माढा ते वडशिंगे दरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, सोलापूर-मिरज एक्स्प्रेस व सोलापूर-पुणे पॅसेंजर एक्स्प्रेसला पंधरा दिवसांचे ग्रहण लागले आहे.

सोलापूरमध्य रेल्वे विभागातील दौंड-सोलापूर सेक्शन दरम्यान दुहेरीकरणाचे कार्य १ एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडी क्र. ७१४१५, ७१४१६, ७१४१३ सोलापूर-पुणे व पुणे-सोलापूर दरम्यान धावणारी पॅसेंजर १ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी क्र. १२१६९, १२१७० सोलापूर-पुणे व पुणे सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस १ एप्रिल ते १५ एप्रिल रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-सोलापूर व सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-मिरज व मिरज ते सोलापूर या एक्स्प्रेस गाड्यादेखील १ एप्रिलपासून १५ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गाडी क्र. ११०१७ लोकमान्य टिळक ते कन्याकुमारी स्थानकापर्यंत धावणारी एक्स्प्रेस फक्त ७ एप्रिलला रद्द करण्यात आली आहे, तर गाडी क्र. ११०१८ कन्याकुमारी ते लोकमान्य टिळक स्थानकादरम्यान धावणारी एक्स्प्रेस ९ एप्रिलला एका दिवसासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यासोबत अनेक एक्स्प्रेस गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत व वळवण्यात आल्या आहेत.

यापूर्वी जेऊर ते वाशिंबे या स्थानका दरम्यान रुळाखालील खडी बदलण्याच्या कामामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून ६ मार्चपर्यंत इंद्रायणी रद्द करण्यात आली होती.चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर रुळावर आलेल्या इंद्रायणीला एक महिन्याच्या आत पुन्हा पंधरा दिवसांचे ब्रेक लागले आहे. यामुळे नागरिक रेल्वे प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.






  •