Sun, Aug 25, 2019 03:40होमपेज › Solapur › सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस उद्या एक दिवस रद्द

सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस उद्या एक दिवस रद्द

Published On: Jun 30 2018 7:01PM | Last Updated: Jun 30 2018 7:01PMपुणे स्थानकावर इ-ब्लॉक

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २ वर इलेक्ट्रीक काम करण्याचे नियोजित असल्याने रविवारी १ जुलै रोजी एक दिवस हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. सोलापूर-पुणे दरम्यान दररोज धावणारी हुतात्मा एक्सप्रेस इ- ब्लॉक मुळे रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असून लाखो प्रवासी पुण्यात अडकून पडणार आहेत. हुतात्मा एक्सप्रेस सोलापूरहून सकाळी ६.३० ला सुटते तर पुण्याहून सायंकाळी ६ वाजता सोलापूरकडे प्रस्थान करते. पुण्याला कामाला असणारे अनेक सोलापूर कर या गाडीने प्रवास करतात. गेल्या वर्षी १ नोव्‍हेंबर २०१७ ते ६ मार्च २०१८ पर्यंत सोलापूर-पुणे इंद्रायणी बंद करण्यात आली होती. 

उद्या रविवारी १ जुलै २०१८ रोजी रविवारी एक दिवसासाठी ह्या एक्सप्रेसला इ-ब्लॉकमुळे थांबा देण्यात आला आहे. प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लांब पल्‍ल्‍याच्या एक्सप्रेस गाड्याचा प्रवास संथ 
पुणे स्थानकावर एक दिवसाचा इलेक्ट्रिक ब्लॉक घेतल्याने लांब पल्याच्या एक्सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळे पेक्षा संथ गतीने धावणार आहेत. त्यामध्ये एल टी टी-विशाखापट्टणम एक्सप्रेस २५ मिनिटे लेट, दरभंगा-पुणे एक्सप्रेस ५ मिनिटे लेट, कोईम्बतूर-एल टी टी एक्सप्रेस २० मिनिटे लेट, चंदीगड-यशवंतपुर एक्सप्रेस २५ मिनिटं लेट, मुंबई-बंगलोर उद्यान एक्सप्रेस २५ मिनिटं लेट