Wed, Apr 24, 2019 00:13होमपेज › Solapur › महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ जनवादी संघटनेचे आंदोलन

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ जनवादी संघटनेचे आंदोलन

Published On: Apr 16 2018 10:57PM | Last Updated: Apr 16 2018 10:20PM सोलापूर : प्रतिनिधी 

महिलांवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे महिलांसह आता लहान बालिकाही या अत्याचाराच्या फेर्‍यात अडकत चालल्या आहेत. त्यामुळे कायद्यातील तरतुदी कडक कराव्यात आणि अशा अत्याचारकर्त्यांना थेट फाशी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये महिलेवर अत्याचार करण्यात आला. जम्मू-काश्मीर येथील कठुवा या गावात 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. देशभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे महिला आणि मुलींच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यांची सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच बलात्कार्‍यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी  संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी शेवंता देशमुख, लिंगव्वा सोलापुरे, नलिनी कलबुर्गी, सुनंदा बल्ला, एस. डी. पाणीभाते, शशी देशमुख, मीरा कांबळे, अशोक बल्ला, मल्लेश कारमपुरी आदी उपस्थित होते.