होमपेज › Solapur › सोलापूर : कैदीच धावला अधीक्षकांच्या अंगावर

सोलापूर : कैदीच धावला अधीक्षकांच्या अंगावर

Published On: Jan 08 2018 4:42PM | Last Updated: Jan 08 2018 4:41PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

कारागृह अधीक्षकांशी त्यांच्याच कार्यालयात वाद घालून त्यांना मारण्यासाठी धावून जाणार्‍या कैद्याविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सचिन उत्तम महाजन (वय 30, रा. माळशिरस, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कारागृहातील कर्मचारी राकेश शिवाजीराव पवार (वय 37, रा. जिल्हा कारागृह वसाहत, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.