Fri, Jul 19, 2019 01:02होमपेज › Solapur › प्रभात टॉकीजमध्ये प्रेक्षकांचा राडा; पैसे परत

प्रभात टॉकीजमध्ये प्रेक्षकांचा राडा; पैसे परत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

 प्रभात चित्रपटगृहात चित्रपट तांत्रिक अडचणींमुळे व्यवस्थित न दिसल्याने प्रेक्षकांनी राडा केला. यावेळी पोलिसांना पाचारण करावे  लागले. शेवटी चित्रपटगृह मॅनेजमेंटला प्रेक्षकांचे पैसे परतच द्यावे लागले. ही घटना ‘रेग्युलर शो’ला घडली.

रविवार सुट्टीचा दिवस होता.चित्रपट रसिक थिएटरकडे बागी-2 हा चित्रपट पाहण्यासाठी प्रभात टॉकीज येथे आले होते. दुपारी 3 ते 6 असा  रेग्युलर शो होता. प्रेक्षकांनी बाल्कनी, फॅमिली, सर्कल अशी तिकिटे काढली होती. चित्रपट सुरु होताच काही वेळाने तांत्रिक अडचणी येऊ लागल्या होत्या. याविरोधात प्रेक्षकांच्या शिट्यांचा आवाज येत होता. मध्यंतरापर्यंत चित्रपट कसाबसा सुरुळीत चालला.

परंतु चित्रपटाचे मध्यांतर झाल्यानंतर  तांत्रिक अडचणी वाढल्या. गाणे लागल्यावर आवाज जात होता. मुख्य भूमिका असलेल्या अभिनेत्याचे सीन येताच पडद्यावर रेघा येणे किंवा आवाज जाणे अशा तांत्रिक अडचणी येऊ लागल्या होत्या. चित्रपटाच्या शेवटी सस्पेंस सिन असल्याने सर्व प्रेक्षक खुर्चीला चिकटून चित्रपट पाहण्यात मग्न होते. चित्रपटाच्या शेवटी ऐनवेळी तांत्रिक अडचणी आल्या.

मध्यंतरापासून तांत्रिक अडचणींना वैतागलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पडद्यावर प्लास्टिकच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत चालल्याने शेवटी चित्रपटगृहाच्या मॅनेजमेंट विभागाने पोलिसांशी संपर्क केला. पोलिस आल्यानंतर गोंधळ कमी झाला. शेवटी प्रेक्षकांनी त्यांचे पैसे परत मागितले. तांत्रिक अडचणींमुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहता आला नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करत मॅनेजमेंटने प्रेक्षकांचे पैसे परतदिले.


  •