Mon, May 20, 2019 18:03होमपेज › Solapur › झारखंड व्यापार्‍यांकडून डाळिंब उत्पादकांची लूट

झारखंड व्यापार्‍यांकडून डाळिंब उत्पादकांची लूट

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 8:36PM

बुकमार्क करा

लक्ष्मी दहिवडी : प्रमोद बनसोडे

मंगळवेढा व सांगोला  तालुक्यात डाळिंबांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढत असुन हे डाळिंब खरेदी करण्यासाठी सांगोला येथे झारखंडसह इतर राज्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात आले आहेत. या व्यापार्‍यांकडून शेतक-यांची आर्थिक लूट व फसवणुक होत असल्याची चर्चा शेतकरी वर्गातुन होत असुन याकडे सांगोला पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतातील डाळिंब विक्रीसाठी मार्केट यार्ड व मोठ्या बाजार पेठेत न घेऊन जाता शेतातच डाळिंब तोडून वजन करून व्यापा-याला विकत आहे. सांगोला तालुक्यात झारखंड, केरळ व राजस्थान आदी भागातील व्यापारी राहत असुन सांगोल्यातील ठराविक एजंटला जवळ धरून शेतक-यांच्या डाळिंब बागेची पाहणी करून तो माल विकत घेतात. पण तो माल ज्या प्रमाणे ठरला जातो. त्याप्रमाणे व्यापारी विकत घेत नाहीत. उलट शेतकर्‍यांनी माल काढला की खराब होऊन जाईल. अशी भीती घालून ठरविल्याप्रमाणे माल न घेता त्या मालाला नावे ठेवुन माल खरडा, डाळिंबावर काळे डाग आहेत, कुजवा आहे अशी कारणे  शेतकर्‍यांनी झाडाचे डाळिंब तोडल्यावर सांगीतली जातात. अशा वेळी जो मध्यस्त एजंट असतो. त्याला व्यापारी एका किलो मागे ठराविक रक्कम कमिशन म्हणून देत असल्यामुळे तेही व्यापा-यांच्या बाजुने बोलत असल्यामुळे शेतकर्‍यांची लुटू व फसवणुक होत आहे. एकीकडे डाळिंबाला दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन दुसरीकडे        शेतक-यांकडून व्यापारी फसवुन डाळिंब खरेदी करीत आहेत.

 बाजारात माल विक्रीला घेऊन जाण्यासाठी होणारा वाहतुक खर्च व वेळ वाचावा यासाठी अनेक शेतकरी डाळिंब आपल्या शेतातच व्यापा-यांना विकतात. माञ काही वेळा व्यापा-यांकडून शेतक-यांना रोख स्वरुपात पैसे न देता चेक दिले जातात माञ दिलेल्या तारखेला चेक बँकेत जमा केले तर ते चेक खात्यावर बॅलन्स नसल्यामुळे चेक बॉन्स होत  असल्याची चर्चा शेतकरी वर्गातुन केली जात आहे. अशा अशिक्षीत शेतकरी तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नसल्यामुळे बाहेरील व्यापा-यांचे चांगलेच अच्छे दिन येत आहेत. शेतकर्‍यांची होणारी ही फसवणुक थांबविण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.