होमपेज › Solapur › पोलिसासह सहाजणांवर गुन्हा

पोलिसासह सहाजणांवर गुन्हा

Published On: Mar 08 2018 11:01PM | Last Updated: Mar 08 2018 9:02PMसोलापूर : प्रतिनिधी

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पोलिस शिपायासह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली तानाजी इंगोले (वय 26, रा. कवितानगर पोलिस लाईन, सोलापूर) या विवाहितेच्या फिर्यादीवरून पती तानाजी शिवाजी इंगोले (वय 32), सासू लक्ष्मीबाई शिवाजी इंगोले ( 55), सासरे शिवाजी गणपत इंगोले (60), संतोष शिवाजी इंगोले ( 30), धनाजी शिवाजी इंगोले (35), संगीता धनाजी इंगोले (रा. कवितानगर पोलिस वसाहत) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तानाजी इंगोले सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असून गेल्या दोन वर्षांपासून तो व त्याच्या घरातील लोक हे त्याची पत्नी दीपाली हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन व माहेराहून एक लाख रुपये आण म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ करतात. दीपालीला उपाशी पोटी ठेवून तिचा क्रूरपणे छळ केला म्हणून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक राठोड तपास करीत आहेत.