Wed, Apr 24, 2019 15:29होमपेज › Solapur › पोलिस चौकीसमोरच पोलिसांसोबत झोंबाझोंबी

पोलिस चौकीसमोरच पोलिसांसोबत झोंबाझोंबी

Published On: Jun 29 2018 11:35PM | Last Updated: Jun 29 2018 11:19PMसोलापूर ः प्रतिनिधी

 जोडभावी पेठ पोलिस चौकीसमोरच पोलिसांसोबत झोंबाझोंबी करणार्‍या  सोळाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी सायंकाळी  बसवेश्‍वर चौकात दोन गटांत हाणामारी होत असताना पोलिसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असताना ही घटना घडली.

पोलिस शिपाई सतेज दिलीप शिंदे (जोडभावी पेठ पोलिस ठाणे)  यांनी फिर्याद दाखल केली आहे.श्रीकांत गायकवाड, सुनील दत्ता ढोणे (रा. आदर्शनगर, शेळगी, सोलापूर), राहुल साठे, अमित कांबळे, भैरु संजय कांबळे, (वय 22, मित्रनगर, शेळगी, सोलापूर),  सुरेश मारुती यादव (वय 22, रा. हांडे गल्ली, शेळगी, सोलापूर), सतीश चकाई, आनंद राजू वाघे (वय 22, रा. कुमार स्वामीनगर, शेळगी, सोलापूर), योगेश मारुती कोरे (वय 19, रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर), अण्णाराव धप्पाधुळे, आकाश पंडित देशमुख (वय 22, रा. शेळगी गावठाण, सोलापूर), सिध्दाराम गजानन कोरे (वय 19, रा. महात्मा बसवेश्‍वर चौक, शेळगी सोलापूर), तम्मा सुतार, ज्ञानेश्‍वर विभुते, सिध्दराम शावरप्पा  बिराजदार (वय 18, शिवगंगानगर, शेळगी, सोलापूर) सिध्दू नागशेट्टी, अमर शिवानंद बिराजदार, प्रशांत गायकवाड  व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  गुरुवारी  सायंकाळी  6.30 च्या सुमारास शिवगंगानगर, शेळगी येथे प्रशांत गायकवाड (रा. कुमारस्वामीनगर, शेळगी) याला मारहाण झाल्याच्या कारणावरुन श्रीकांत गायकवाड, सुनूल ढेणे, राहुल साठे, अमित कांबळे, भैरु कांबळे, सुरेश यादव, सतीश चकाई, आनंद वाघे, योगेश मोरे यांनी हातात काठ्या घेऊन प्रशांतला कोण मारले यावरुन मोठमोठ्याने शिवीगाळ करत शेळगी भागात गेले. शेळगी गावठाण येथील अण्णाराव धप्पाधुळे, आकाश देशमुख, सिध्दू कोरे, तम्मा सुतार, सिध्दू नागशेट्टी, अमर शिवानंद, बिराजदार व इतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून दोन्ही गटांतील संशयित आरोपींनी शेळगी भागातील  बसवेश्‍वर  चौकात जोडभावी पेठ पोलिस चौकीसमोर मारामारी केली.

पोलिसांशी झोंबाझोंबी

पोलिसांनी मारामारी रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांसोबत झोंबाझोंबी करत शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.आरोपींनी घटनास्थळाजवळील महावितरणाच्या इलेुक्ट्रक डीपीवर दगड मारुन परिसरातील वीज बंद केली. ही मारामारी झाल्याने शेळगी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.सर्व आरोपींविरोधात मारामारी, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जोडभावी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोसई खटके करत आहेत.