Sat, Jan 19, 2019 00:34होमपेज › Solapur › पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी राजेंद्र पाटील यांची निवड

पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी राजेंद्र पाटील यांची निवड

Published On: Jul 02 2018 3:05PM | Last Updated: Jul 02 2018 4:12PMपंढरपूर : प्रतिनिधी

तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी आमदार परिचारक गटाचे गुरसाळे पं. स. गणाचे सदस्य राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळते सभापती दिनकर नाईकनवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावर पाटील यांची निवड झाली आहे. 

तत्पूर्वी सकाळी परिचारक गटाच्या सर्व सदस्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक झाली होती. या वेळी राजेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले. त्यानंतर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १ वाजल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी राजेंद्र पाटील यांची सभापतीपदी  निवड झाल्याचे जाहीर केले आणि पाटील यांचा सत्कार केला. यावेळी सहायक निवडणूक निर्णयाधिकारी एस. जे. पवार उपस्थित होते. निवडीनंतर जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते नूतन सभापती पाटील यांचा सत्कार केला. 
यावेळी उपसभापती अरुण घोलप, माजी सभापती दिनकर नाईकनवरे, सदस्य संभाजी शिंदे, सत्यवान देवकुळे, प्रशांत देशमुख दादासाहेब मोटे, राजश्री भोसले, पल्लवी यलमार, उमादेवी चव्हाण, अर्चना पाटोळे, राहुल पुरवत, बाजार समिती सभापती दिलीप घाडगे, माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे, तानाजी वाघमोडे, माजी जि. प. सदस्य बाळासो देशमुख आदी उपस्थित होते. नूतन सभापती पाटील यांचा आमदार प्रशांत परिचारक यांनी सत्कार केला.