Mon, Jun 24, 2019 21:13होमपेज › Solapur › पद्मनगर येथे घरफोडीत 2 लाखांचा ऐवज लंपास

पद्मनगर येथे घरफोडीत 2 लाखांचा ऐवज लंपास

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:40PMसोलापूर : प्रतिनिधी

  शहरात चोरट्यांनी धूमाकूळ माजवला असून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या पद्मनगर येथे राहणार्‍या व्यापार्‍याच्या घरावर धाडशी चोरी झाली आहे. यामध्ये दोन लाखांचा  सोन्या-चांदीचा ऐवज लंपास झाला आहे.

पद्मनगर येथे राहणारे व्यापारी बागवान हे रविवारी घराला कुलूप लावून अपघातग्रस्त नातेवाईकांना पाहण्यासाठी परगावी गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यांनी घरात असलेल्या कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये  ठेवलेले साडेसहा तोळे सोन्याचा ऐवज,  तीन हजार रुपये रोख रक्‍कम असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

सोमवारी दुपारी घरी परतल्यानंतर बागवान यांच्या लक्षात आले की, चोरट्यांनी घर फोडले आहे. त्यांनी लगेच एमआयडीसी पोलिस ठाण्यास माहिती दिली. घटनास्थळी डीसीपी अपर्णा गीते, डीसीपी पौर्णिमा चौगुले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी धाव घेतली. श्‍वान पथकास पाचारण केले; परंतु श्‍वानपथक काही अंतरावर जाऊन घुटमळले. पोलिसांनी घटनास्थाळावरून  बोटांचे ठसे घेतले आहेत.