Sun, Jul 21, 2019 16:47
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › ऑर्केस्ट्रा बारमधील युवतीचा विनयभंग

ऑर्केस्ट्रा बारमधील युवतीचा विनयभंग

Published On: Mar 21 2018 11:01PM | Last Updated: Mar 21 2018 10:28PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल सुयोग ऑर्केस्ट्रा बारमधील गायिका युवतीस मारहाण करून तिचा विनयभंग करणार्‍या दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच हॉटेल सुयोगमध्ये यापूर्वी एका नगरसेवकाचीही भांडणे झाली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या हॉटेल सुयोग ऑर्केस्ट्रा बारमध्ये हाणामारी होण्याच्या अनेक घटना घडल्यामुळे या ऑर्केस्ट्रा बारवरच कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहेे.

जितेंद्र दत्तात्रय इटाई (रा. दक्षिण कसबा, चौपाड, सोलापूर) आणि केत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीने फिर्याद दाखल केली आहे. पीडित तरुणी ही हॉटेल सुयोग ऑर्केस्ट्रा बारमध्ये गायिका म्हणून काम करते. मंगळवारी सायंकाळी हॉटेलच्या वरच्या मजल्यावर  तिच्या रुममध्ये असताना जितेंद्र इटाई व केत नावाची व्यक्ती या दोघांनी येऊन पीडितास शिवीगाळ करत मारहाण करून तिला बेडवर ढकलून देऊन तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला, तर केत याने पीडितेसोबतच्या गायकास शिवीगाळ करून त्यालाही दमदाटी केली म्हणून फौजदार चावडी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Tags : solapur, orkestra bar,girl,molestation,issue,