Mon, Apr 22, 2019 03:52होमपेज › Solapur › ऑर्केस्ट्रा बारमधील गायिकेवर बलात्कार

ऑर्केस्ट्रा बारमधील गायिकेवर बलात्कार

Published On: Feb 13 2018 1:58AM | Last Updated: Feb 12 2018 10:47PMसोलापूर : प्रतिनिधी

विजापूर रोडवरील होनमुर्गीजवळील आम्रपाली ऑर्केस्ट्रा बारमधील पंजाबच्या गायिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी ऑर्केस्ट्रा बारच्या मॅनेजरविरुद्ध विजापूर नाका पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.शेषनारायण ऊर्फ सुरेश दुबे (रा. सुशीलनगर, विजापूर रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या मॅनेजरचे नाव असून तो पळून गेला आहे. याबाबत गायिकेने फिर्याद दाखल केली आहे.आम्रपाली ऑर्केस्ट्रा बारमध्ये  पीडित पंजाबची महिला ही 8 नोव्हेंबर 2017 पासून गायिकेचे काम करीत होती. ती सोलापूर शहरात राहते, तर शेषनारायण दुबे हा याच ऑर्केस्ट्रा  बारमध्ये  मॅनेजरचे  काम करतो. दुबे याने गायिका ऑर्केस्ट्रा बारमधील मेकअप रूममध्ये असताना तिच्याशी जवळीक साधून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुबे याने गायिकेला आठवड्याचा पगार देण्याचा बहाणा करून मेकअप रूममध्ये बोलावले. तिथे पीडित गायिकेला  कोल्ड्रिंक्स पिण्यास सांगितले. ते कोल्ड्रिंक्स  पिल्यानंतर पीडित गायिका ही बेशुध्द अवस्थेत गेली. त्यावेळी मॅनेजर दुबे याने तिच्यावर बलात्कार केला.ती राहण्यास असलेल्या रुममध्ये अनेकवेळा तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध केले म्हणून दुबे याच्याविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच मॅनेजर दुबे पळून गेला असून  सहायक  पोलिस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.