Sun, Apr 21, 2019 00:23होमपेज › Solapur › हवालदाराला चौकीतच वीट फेकून मारली

हवालदाराला चौकीतच वीट फेकून मारली

Published On: Jun 15 2018 10:35PM | Last Updated: Jun 15 2018 10:22PMसोलापूर : प्रतिनिधी

पोलिस चौकीमध्ये काम करीत बसलेल्या पोलिस हवालदाराला पोलिस चौकीतच वीट फेकून मारणार्‍या तरुणाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री जोडभावी पेठ पोलिस चौकीमध्ये घडली.

विनायक दत्तात्रय नारबंडी (वय 22, रा. भुलाभाई चौक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार दत्तात्रय गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.दत्तात्रय गायकवाड हे गुरुवारी रात्री जोडभावी पेठ पोलिस चौकीत चौकी अंमलदार म्हणून काम करीत होते. त्यावेळी रात्री दहाच्या सुमारास रेकॉर्डवरील इसम विनायक नारबंडी याची तक्रार हवालदार गायकवाड यांनी घेतली. दरम्यानच्या काळात दुसरा तक्रारदार सिद्धू किशोर जाधव हे त्यांची पत्नीविरुद्धचीही तक्रार घेऊन पोलिस चौकीत आले असता  गायकवाड हे जाधव यांची तक्रार ऐकून घेत होते. त्यावेळी नारबंडी याने गायकवाड यांच्याकडे येऊन मला मारलेल्या अजय शिंदेला आणा आणि त्याला अटक करा, असे सांगितले. त्यावेळी हवालदार गायकवाड यांनी नारबंडी यास थांबण्यास सांगितले. त्यावेळी रागाने नारबंडी हा चौकीबाहेर गेला व तिथे जाऊन झाडाच्या कडेस लावलेल्या विटांपैकी एक वीट हातात घेऊन हवालदार गायकवाड यांच्या दिशेने धावत येऊन तू अजयला कसा आणत नाही, तुला दाखवतोच मी काय आहे, असे म्हणून वीट गायकवाड यांना फेकून मारली. त्यावेळी गायकवाड यांनी ती वीट चुकवली असता ती वीट सिध्दू जाधव यांच्या डोक्यात लागून त्यांना दुखापत झाली. त्यावेळी जोडभावी पेठ पोलिस चौकीचे बीट मार्शल हे  नारबंडी यास पकडण्यासाठी गेले असता त्याने गायकवाड यांच्यावर हल्ला करून शिवीगाळ करून मारण्यासाठी अंगावर धावून गेला. म्हणून याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक नागेश मात्रे तपास करीत आहेत.