Wed, Nov 14, 2018 18:59होमपेज › Solapur › सोलापूर : बनावट नोटा तयार करणार्‍यास अटक

सोलापूर : बनावट नोटा तयार करणार्‍यास अटक

Published On: Jan 23 2018 1:36PM | Last Updated: Jan 23 2018 1:36PMसोलापूर : प्रतिनिधी
शहरातील  शुक्रवार  पेठेतील  जामा  मशिदीच्या  मागे एका  खोलीमध्ये चलनातील बनावट नोटा तयार करणार्‍या वृध्दास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली असून याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जियाउद्दीन अमीनसाब दुरुगकर (वय ६०, रा. ३९३, शुक्रवार पेठ, जामा मशिदीच्या मागे, सोलापूर)  असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत हवालदार निलकंठ तोटदार यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत  जेलरोड पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार तोटदार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलिस उपनिरीक्षक भिमसेन जाधव, हवालदार पवार, कोतवाल, पोलिस नाईक पवार, पापडे, सावंत यांनी केली. पोलिस उपनिरीक्षक चानकोटी तपास करीत आहेत.