Sun, May 19, 2019 13:57
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

Published On: Jan 29 2018 11:25PM | Last Updated: Jan 29 2018 10:37PMसोलापूर : प्रतिनिधी

  ऑईल फॅक्टरीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 1 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. सलीम अलीम पठाण(वय 49, रा. लोकमान्यनगर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सप्टेंबर 2017  मध्ये गोवा येथे ऑईल फॅक्टरी असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याची जाहिरात देण्यात आली होती. अतुल सुभाष  कुलकर्णी (रा. श्रध्दा अपार्टमेंट, आरटीओ कार्यालयाजवळ सोलापूर) याने ही जाहिरात दिली होती. 33 हजार रुपये भरा व दरमहा 5 हजार रुपये कमवा, अशी जाहिरात दिली होती. त्यानुसार सलीम पठाण यांनी विश्‍वासाने प्रत्येकी 33 हजार 400 प्रमाणे एकूण 1 लाख 33 हजार 600 रुपये असे गुंतवले होते.त्याकरीता सलीम पठाण यांनी सोलापूर येथील एका खासगी वकीलाकडे करारपत्रदेखील केले होते. परंतु ही  रक्कम संशयित आरोपी अतुल कुलकर्णी याने स्वत:च्या फायद्याकरीता वापरली आहे. कुठलाही फायदा फिर्यादीस दिला नाही व राहते घर सोडून निघून गेला आहे, अशी नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि आवारे करीत आहेत. दरम्यान, सोलापुरात अशाप्रकारे आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

महिला व तरुणास मारहाण

मागील भांडणाचा राग मनात धरुन  सिध्दार्थ प्रभाकर पाचगुडे, रोहित प्रभाकर पाचगुडे, प्रभाकर पाचगुडे (सर्व रा. भारतमातानगर, कुमठा नाका, सोलापूर) यांनी मीनाक्षी व विजय यांना मारहाण केल्याची तक्रार सदर बझार पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

शनिवारी रात्री कुमठा नाका येथील भारतमातानगर येथे राहत्या घराजवळ मीनाक्षी सुनील सलगर (वय 48, रा. भारतमातानगर, कुमठा नाका) थांबल्या असता नमूद आरोपींनी मागील भांडणाचा राग मनात धरुन घाणघाण शिव्या देण्यास सुरुवात केली. शिवीगाळीचे रुपांतर लाथाबुक्क्यांच्या मारहाणीमध्ये झाले. मीनाक्षी सलगर यांच्या नणंदेचा मुलगा विजय हा सोडवण्यास गेला असता सिध्दार्थ पाचगुडे याने नळीच्या पाईपने विजयच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले आहे. यामध्ये मीनाक्षी सलगर व विजय असे दोघे जखमी झाले आहते. सदर बझार पोलिस ठाण्यात मीनाक्षी सलगर यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोह पाडवी करत आहेत.