Wed, Jun 26, 2019 17:27होमपेज › Solapur › ऊसाच्या ट्रॅक्टरला बसची धडक; २३ जखमी

ऊसाच्या ट्रॅक्टरला बसची धडक; २३ जखमी

Published On: Mar 07 2018 2:36PM | Last Updated: Mar 07 2018 2:36PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी पुलावर ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून ट्रॅव्हल्स बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री अडीचच्या सुमारास झाला.

मंगळवारी रात्री मॉर्निंग स्टार ट्रॅव्हल्स बस पुण्याहून हैद्राबादला जात होती. बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास बस लांबोटी पुलावर आली असता समोर असणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडकली. यामध्ये बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.